Sunday, May 12, 2024
Homeकृषीकेळी-माणकेश्वर येथे रोजगार हमीच्या कामास सुरुवात.

केळी-माणकेश्वर येथे रोजगार हमीच्या कामास सुरुवात.

जुन्नर (प्रतिनिधी) : केळी-माणकेश्वर येथे रोजगार हमीच्या कामास सुरुवात चावंड गावच्या उपसरपंच माधुरीताई सतीश कोरडे यांच्या हस्ते उद्धाटन करून झाली. यावेळी किसान सभेच्या सातत्याच्या संघर्षमुळे आमच्या गावात रोजगार हमी कायद्याची निर्मिती झाल्यापासूून तब्बल १५ वर्षानंतर रोजगार मिळाल्याची भावना त्यांनी महाराष्ट्र जनभूमीशी बोलताना व्यक्त केली.

२००५ साली कम्युनिस्ट पक्षाच्या ६४ खासदारांच्या दबावामुळे तत्कालीन युपीए सरकारला रोजगार हमी कायदा संमत करावा लागला. परंतु केळी-माणकेश्वर गावात रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी होण्यास १५ वर्षे जावी लागली. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी किसान सभा, विविध संस्था- संघटना सातत्याने प्रयत्नशील होत्या. परंतु राजकीय उदासीनता आणि रोजगार हमीच्या कामांचा पुर्वीचा अनुभव यामुळे लोकांमध्ये रोजगार हमी बद्दल फारच उदासीनता होती.

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने ग्रामीण कष्टकरी लोकांचे आर्थिक गणित बिघडले होते. केंद्र सरकारने रोजगार हमीचा निधी वाढवून ६० हजार कोटी वरुन १ लाख कोटी केला. किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद पुणे यांनी रोजगार हमीची विशेष मोहिम हाती घेतली, आणि त्यामुळे आज जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोजगार हमीची कामे चालू आहेत. त्यांच्याच प्रयत्नांतून आज ग्रामपंचयत चावंड अंतर्गत येथील केळी-माणकेश्वर गावामध्ये रोजगार हमीची कामे चालू करण्यात आली.

यावेळी सदस्य पांडुरंग गवारी, माणकेश्वर गावचे पेसा अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडे, माजी तंटामुक्ति अध्यक्ष गुलाब शेख, खडकुंबे विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक दशरथ चव्हाण, किसान सभेचे जुन्नर तालुका समिती सदस्य कोंडीभाऊ बांबळे, ग्रामरोजगार सेवक रोहिदास शेळकंदे आदीसह ग्रामस्त व मजूर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय