Sunday, September 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भाजपा सांस्कृतिक सेल च्या अध्यक्षपदी विजय भिसे यांची निवड 

PCMC : भाजपा सांस्कृतिक सेल च्या अध्यक्षपदी विजय भिसे यांची निवड 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड आणिक पुणे शहरातील कला, संगीत, साहित्य सांस्कृतिक चळवळीत सदैव सक्रिय असलेले विजय भिसे यांची भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक सेल च्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 1983 ते 1985 मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी पुणे शाखा येथे पूर्णवेळ काम केले आहे. 

पिंपळे सौदागर येथील भूमिपुत्र असलेले विजय भिसे यांचा पुणे शहरात होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सदैव सहभाग राहिला आहे. पुणे शहरातील सवाई गंधर्व महोत्सव गेली 35 वर्षे ते श्रवण करत आले आहेत. पुण्यातील आशय फिल्म क्लबचे ते आजीव सदस्य आहेत.

पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशचे ते संस्थापक आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुजाता पालांडे यादेखील फौंडेशनच्या कार्यकारीणी सदस्य आहेत. फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दरवर्षी एक्कावन्न हजार रुपयांचा कलाविभूषण पुरस्कार गुणी कलाकारांसाठी सुरू केला आहे. सावनी रवींद्र यांना मानाचा पहिला पुरस्कार दिला गेला. त्यानंतर नागराज मंजुळे यांनाही हा पुरस्कार दिला गेला तसेच त्यांची जाहीर प्रकट मुलाखत देखील घेण्यात आली. 

राधा मंगेशकर यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आणि मुलाखतही गाजली. अनेक सांगितिक कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केले आहे, पृथ्वीराज थिएटर्स, स्वरा म्युझिकल सारख्या संस्थांना बरोबर घेऊन त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सांगितिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. विजय भिसे यांचे हे पैलू पाहून भाजपा चे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांनी ही नियुक्ती केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय