आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री. ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आदी संस्थानचे माध्यमातून वारजे माळवाडी येथील स्मिता पाटील विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून ओळख ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन उत्साहात करून मुलांसाठी सामाजिक बांधिलकीतून होत असलेल्या उपक्रमात प्रशाला सहभागी झाली. (ALANDI)
यावेळी शिक्षक दिन उत्साहात परंपरांचे पालन करीत साजरा करण्यात आला. भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात ” ओळख ज्ञानेश्वरी ” या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ड्रीम इंडिया स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीताच्या माध्यमातून शिक्षक दिना विषयी माहिती सांगितली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे यांनी ओळख ज्ञानेश्वरी या उपक्रमा विषयी माहिती सांगितली. (ALANDI)
कार्यक्रमास उपक्रमाचे मुख्य संयोजक श्री. ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश काळे यांनी ” ओळख ज्ञानेश्वरीची ” हा उपक्रम राबविणार्या महाराष्ट्रातील शाळां मध्ये स्मिता पाटील शाळा ही पुणे शहरातील एकमेव शाळा असून शिक्षक दिनी या उपक्रमाची सुरुवात झाली. हा दुग्ध शर्करा योग आहे.” असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी गौरव शिरोळे, सोनाक्षी आवाढ, मानव कदम, विद्यार्थी मुख्याध्यापिका संजना माशाळ या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी ह.भ.प.प्रकाश काळे, संस्थापिका अंजनी स्कूल सुरेखा कुंभार, उद्योगपती पराग इनामदार, राजेश नागरे, समन्वयक कैलास आव्हाळे, समाजरत्न संस्थापक नवभारत ज्ञानवर्धिनी संस्था एस. आर. पाटील, जीवनी पाटील शालेय शिक्षण समिती, ड्रीम इंडिया स्कूलच्या संचालिका संस्कृती पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक के. जी. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन के. बी. पाटील यांनी मानले. के. जी. पाटील यांनी आभार मानले.
***
***