Saturday, July 27, 2024
HomeNewsश्री सिद्धेश्वर महास्वामींच्या स्मरणार्थ गुरु नमन महोत्सवाचे भोसरीत आयोजन

श्री सिद्धेश्वर महास्वामींच्या स्मरणार्थ गुरु नमन महोत्सवाचे भोसरीत आयोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : बसव सेवा संघाच्या वतीने श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या स्मरणार्थ गुरू नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष राम नाईक, उपाध्यक्ष शंकरगौडा हादिमनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भोसरी येथील कै. अंकुश लांडगे नाट्यगृह येथे संध्या ५ वाजता होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कर्नाटक येथील ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख पूज्य बसवलिंग महास्वामीजी, पूज्य अमृतानंद स्वामी, पूज्य हर्षानंद स्वामी, पूज्य श्रध्दानंद स्वामी, पूज्य आत्माराम स्वामी, पूज्य ईश प्रसाद स्वामी, आमदार महेश लांडगे, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ.पी.डी पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ विजयालक्ष्मी बाळेकुंद्री, बसव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरगौडा बिरादार आदी उपस्थित राहणार आहे.

बसव सेनेबद्दल माहिती देताना अध्यक्ष राम नाईक म्हणाले कि, या संस्थेची स्थापना दि १४ जानेवारी २००१ रोजी बसवेश्वरांचे जन्मस्थान बसवन बागेवाडी येथे समाज हितासाठी केली. या संस्थेचे उदघाटन महान ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. हि संस्था 2003 पासून पुणे शहरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन,बसवादी शरण तत्त्वांचा प्रसार करणे, नागरीकांमध्ये धार्मिकता देशभक्ती, नितीमत्तेचे बिज पेरणे आणि सामाजिक सुधारणेसाठी, स्वाभिमानी संघर्षाची भावना रुजवत असू, बसव मेळाव्याचे आयोजन करते. समाजाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना ‘बसवभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करतात. यावेळी पत्रकार परिषदेस अण्णाराय बिराजदार, नंदकुमार साळुंखे, शिवान्ना नरुनी , आनंद जक्कनवर, अजय जाधव, युवराज कनवी आदी उपस्थित होते. 

स्वामींविजयी थोडक्यात… 

सिद्धेश्वर स्वामींना अध्यात्माची आवड असल्याने वयाच्या १४ व्या वर्षी पूज्य श्री मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे ते शिष्य बनले. त्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर आध्यात्मिक प्रसार व प्रचार केला.बसवेश्वर यांचा विचार तळागाळातल्या भाविकांपर्यंत पोचवला. मात्र हे करीत असताना अद्याप कुठल्याही पदाचा, पैशाचा, धनसंपत्तीचा मोह धरला नाही. इतकेच काय तर केंद्र सरकारने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार आणि कर्नाटक विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी त्यांनी नम्रपणे नाकारली असे संत मिळणे दुर्मिळच आहे. माझ्यासारख्या संन्यांशी माणसाला पुरस्कार कशाला ? अशा भावनेने हा पुरस्कार नाकारला. सन्यासी माणसाने ऐहिक सुखाचा त्याग करायचा असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या शर्ट ला खिसा ठेवला देखील नाही. कर्नाटकात अनेक आश्रमनिर्माण केले. त्यातून त्यांनी त्यागी, योगी, निस्वार्थी हजारो साधक तयार केलेत.

परदेशात देखील त्यांनी ज्ञानाचा प्रसार व प्रचार करून संताचे विचार दुरवर पोचवले. ते केवळ संत नव्हते तर एक चालते बोलते सत्पुरुष, दैवी अवतारच असल्याचे काही भक्त सांगतात. वयाच्या ८१ व्या वर्षी २ जानेवारी २३ रोजी त्यांनी वैकुंठ एकादशीला या जगाचा निरोप घेतला.अशा स्वामींच्या पश्चात त्यांची संपत्ती म्हणजे २ शर्ट, लुंगी, एक स्लीपर चप्पल, व चष्मा  माझ्या नावे पुरस्कार आणि स्मारक नसावे, अस्थी नदीत सोडु नयेे, पृथ्वीवर भार नको म्हणून अग्नी द्यावा असा संकल्प त्यांनी जाहीर केला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय