Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता...

मोठी बातमी : पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

Pune ED Raid : पुण्यात शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांच्या मालमत्तेवर ईडीने छापा टाकत 85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे, सोलापूर, आणि अहमदनगर येथील मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात आली आहे.

मंगलदास बांदल यांच्यावर कर्ज घेऊन फसवणुकीचा गंभीर आरोप आहे. यापूर्वीही या प्रकरणात अनिल भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.मंगलदास बांदल यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निकट संबंध असल्याचे म्हटले जाते, तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ईडीने यापूर्वी 21 ऑगस्ट रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी छापे टाकले होते, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती आणि काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. त्यांचे बँक खाते तपासले गेले आहे. याशिवाय, पुणे पोलिसांनी त्यांच्यावर एका सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

या घटनेमुळे मंगलदास बांदल यांची अडचण वाढल्याचे दिसत आहे.

Pune ED Raid

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता

बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू

आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट

महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

संबंधित लेख

लोकप्रिय