गुजरात : गुजरातमध्ये भूकंपाचे (Gujarat Earthquake) सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 10.26 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती.
गुजरातच्या कच्छमध्ये ऑगस्ट महिन्यात दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले होते. त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली होती. आज सकाळी 10.26 वाजेच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप गुजरातमधील सुरतपासून 61 किमी अंतरावर झाला आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती.