Sunday, April 28, 2024
HomeNewsउत्तर पाकिस्तानात भूकंप ९ ठार,शेकडो जखमी

उत्तर पाकिस्तानात भूकंप ९ ठार,शेकडो जखमी

उत्तर भारतासह मध्यआशियात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली:
दिल्लीसह हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही राज्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत.तुर्कमेनिस्तान,भारत, कझाकिस्तान,पाकिस्तान, ताजिकिस्तान,उझबेकिस्तान, चीन,अफगाणिस्तान आणि किर्गिस्तान या देशांसह नवी दिल्ली,जम्मू,हिमाचल,उत्तरप्रदेश येथे आज रात्री 10.53 वा ६.६ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के सुरू झाले होते.भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील कलाफगनपासून ९० किमी अंतरावर असल्याचे मानले जाते.

इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट युरेशियन प्लेटशी टक्कर देत आहे आणि त्यामुळे हे धक्के बसत आहेत. वायव्य भारत आणि दिल्लीतील लोकांना ४५ सेकंद धक्के बसल्यामुळे क्षणभर लोक घराबाहेर आले.या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये फैजाबाद येथे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय