Friday, November 22, 2024
Homeग्रामीणआधार केंद्र सुरू करण्याबाबतची DYFI सुरगाणा तालुका कमिटीच्या मागणीला यश.

आधार केंद्र सुरू करण्याबाबतची DYFI सुरगाणा तालुका कमिटीच्या मागणीला यश.

                            

(सुरगाणा) : सुरगाणा तालुक्यात DYFI संघटनेने तहसील अधिकारी यांना काही दिवसांपूर्वी आधार केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. 

निवेदनात त्यांनी सुरगाणा तालुक्यातील जनतेला आधार कार्ड काढण्यासाठी वणी (दिंडोरी) या ठिकाणी जावे लागत होते. त्याचा होणार खर्च प्रमाणाच्या बाहेर होत असल्याने DYFI चे राज्य उपाध्यक्ष इंद्रजित गावित, अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली DYFI सुरगाणा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.

इंद्रजित गावित यांच्याकडून आणि तहसील अधिकारी मिळालेल्या माहिती नुसार सुरगाणा तालुक्यातील सात ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यात चार ठिकाणी आधार कार्ड केंद्र मंजूर झाल्याची माहिती मिळाली. DYFI च्या मागणीला यश मिळाले.

संबंधित लेख

लोकप्रिय