Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Amol kolhe: डॉ.अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Amol kolhe : शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मायबाप जनतेने हि निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी व्यक्त केला.

---Advertisement---

एक जबाबदारी ची भावना आहे, देशातील जनतेने निर्णय घेतल्याचे जाणवते. महागाई, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव यासारख्या अनेक विषयांवर या सरकारने जनतेची निराशा केली आहे. हे सरकार बदलायचे हा सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतला आहे. या बदलाचा शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोणताही डमी उमेदवारी अर्ज भरणार नाही. आईच्या चरणावर डोकं ठेवून निघालो आहे. ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकता, निष्ठा हेतू निष्टता असते त्याच्या मागे सगळं जग त्याला यश देण्यासाठी उभे राहते अशा भावना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी व्यक्त केल्या आहे.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विध्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात ही लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८ हजारांनी पराभव केला होता. यावेळी देखील या दोघांमध्ये लढत होणार आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles