Friday, November 22, 2024
Homeराज्य100 आदिवासी कुटुंबाना सौरदिव्यांचे वितरण - सावली फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ...

100 आदिवासी कुटुंबाना सौरदिव्यांचे वितरण – सावली फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ होरायझन यांचा उपक्रम

कोल्हापूर / शिवाजी लोखंडे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण नुकताच साजरा केला. पण या अमृतमहोत्सवी स्वातंत्र मिळालेल्या आपल्या देशात आजही असे काही भाग आहेत जिथे मूलभूत सोयी सुविधा पोहचलेल्या नाहीत. आर्थिक सुबत्ता असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात देखील आजही अशी अनेक आदिवासी गावे आहेत जिथे वीज उपलब्ध नाही. अत्यंत दुर्गम आणि जंगलाने वेढलेली ही सर्व आदिवासी गावे रात्रीच्या अंधारात जीव मुठीत धरून राहत आहेत.

येथील सावली फौंडेशन, कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेच्या परिसरातील, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या  तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात तोंडेर, चिटवेली, नैनुगूडाम, आसा, चिंत्तवेर आणि कुर्ता ही नक्षलग्रस्त आदिवासी पाडे आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आता इडी ( ED) च्या रडारवर !

या आदिवासी पाड्यातील शंभर कुटुंबाना सौर दिवे उपलब्ध व्हावेत असा मनोदय होता. या उपक्रमाबाबत समाज माध्यमावर केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि शंभर सौर दिव्यांच्या  माध्यमातून शंभर घरे प्रकाशमान करण्याचा मनोदय सर्वांच्या माध्यमातून पूर्ण झाला. या उपक्रमास श्री राम फौंड्री-झंवर गृप ऑफ इंडस्ट्ररीज, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व दिवे प्रत्येक गरजू बांधवा पर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम संस्था मित्र सुदीप रंगूवार, अहेरी यांनी पूर्ण केले. 

सावली संस्थेचे संस्थापक निखिल कोळी, अध्यक्ष प्रथमेश सूर्यवंशी, सेक्रेटरी निखिल पोतदार, उपाध्यक्ष अनिकेत जुगदार तसेच रोटरी क्लब ऑफ होरायझन चे अध्यक्ष रो. रवीकुमार केलगीनमठ, सेक्रेटरी रो. सुमित बिरंजे यांनी आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत उपक्रमाला मदत केलेल्या सर्व देणगीदारांचे आभार मानले. उपक्रम समन्वयक म्हणून  रो. सागर बकरे यांनी काम पाहिले.

पुणे : अभिसार फाउंडेशन मध्ये ऑटिझम डे साजरा


संबंधित लेख

लोकप्रिय