Saturday, May 18, 2024
Homeराज्यएसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा अल्टिमेट, सरकारलाही सुनावले; उद्या महत्वाची सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा अल्टिमेट, सरकारलाही सुनावले; उद्या महत्वाची सुनावणी

मुंबई :  राज्यातील एस. टी. (ST Strike) कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राज्य सरकारच्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाही. असे असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court ) एस.टी. कर्मचाऱ्यांना अल्टिमेट देत सरकारलाही सुनावले आहे.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी मान्य झालेली नाही, त्यामुळे कामगारांनी कामावर हजर रहावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी कोर्टाने एसटी कामगारांना 15 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. 

तसेच कोर्टाने पुढे म्हटले आहे की, “एसटी कामगारांना कामावरून काढू नका. या शिवाय पुढचे चार वर्ष राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे पुढील निर्णय घेईल.”

उद्या महत्वाची सुनावणी !

याबाबत उद्या सकाळी 10 वाजता महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यामध्ये सरकार व एसटी कर्मचारी यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. उद्या कोर्ट काय निर्देश देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेट्रोल डिझेल दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ; महागाई तीव्र होण्याची शक्यता

पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज !

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आता इडी ( ED) च्या रडारवर !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय