Friday, July 12, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार सातवे वेतन !

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार सातवे वेतन !

 

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मे महिन्याचा पगार दिला जाईल, असे आश्‍वासन पीएमपीचे अध्यक्ष तथा महाव्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आयोजित बैठकीत दिले आहे.

आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात ही बैठक झाली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे व पदाधिकारी उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा अल्टिमेट, सरकारलाही सुनावले; उद्या महत्वाची सुनावणी

पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा, यासाठी दोन्ही महापालिकांनी पीएमपीला संचलन तुटीची रक्कम दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी महासंघाकडून करण्यात आली. त्यांची मागणी मान्य करीत पीएमपीचे महाव्यवस्थापक मिश्रा यांनी मे महिन्याचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार देण्याचे मान्य केले.

या निर्णयाचा फायदा सुमारे 9 हजार पीएमपी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पेट्रोल डिझेल दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ; महागाई तीव्र होण्याची शक्यता

कर्मचारी राज्य विमा महामंडळ दिल्ली येथे १७६ जागांसाठी भरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय