Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजनसंवाद सभेमध्ये 'ब' प्रभागातील अधिकाऱ्यांची मनमानी व सावळा गोंधळ - मधुकर बच्चे

जनसंवाद सभेमध्ये ‘ब’ प्रभागातील अधिकाऱ्यांची मनमानी व सावळा गोंधळ – मधुकर बच्चे

पिंपरी चिंचवड : महापालिकेमध्ये प्रशासकीय कारभार आहे. आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा आयोजित केल्या आहेत. चिंचवड येथील ब प्रभागात पहिली जनसभा खुली चर्चा करून झाली. परंतु दुसरी जनसभा अचानक बंद कॅबिन मध्ये एक नागरिक आत बोलावून घेण्यास सुरू केली या मनमानी विरोधात उपस्थित सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी जाहीर विरोध केला.

निवेदने फाडून अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकून जाहीर निषेध केला व पुढील संवाद सभा जाहीर व्हावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली यावर अनेक नागरिकांच्या सह्या केल्या. परंतु या वेळी ही सोमवार दि.4 रोजीची जनसंवाद सभा एक नागरिकास क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या छोट्या कॅबिन मध्ये घेऊन निवेदन स्वीकारण्यास सुरवात केली, यास उपस्थित नागरिकांनी कडाडून विरोध केला.  

पेट्रोल डिझेल दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ; महागाई तीव्र होण्याची शक्यता

क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दाराबाहेरच जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलनच सुरू केले. परंतु प्रशासनास त्याचा काही परिणाम झाला नाही, आणखी जास्त सुरक्षा रक्षक मागून नागरिकांनाच दमदाटी देण्याचा प्रकार पहायला मिळाला. नागरिकांच्या भावनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कार्यालयातच एक एक निवेदन स्विकारीत काम सुरू ठेवले.

या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक समस्या घेऊन उपस्थित होते. 10 वा आलेल्या नागरिकांना 12 ते 1 वाजता तक्रार देण्यास नंबर येतो म्हणजे प्रशासनाच्या आडमुठे पणामुळे नागरिकांचा नाहक 2 ते 3 तासाचा वेळ त्रास सहन करून वाया जात आहे. जाहीरपणे जनसंवाद सभा घेतली तर 1 तासात सर्व तक्रारी निकाली निघू शकतात.

पुणे : ..त्यांनी चक्क नवजात मुलीला घरी आणले हेलिकॉप्टरने, मुलीच्या जन्माने आनंदोत्सव…हा व्हिडिओ पाहाच !

या बाबतीत चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे म्हणाले की, प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, आणि कशाला घाबरताय हेच नागरिकांना समजेना. नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी प्रशासनाने जाहीर संवाद सभा घेतली पाहिजे. वेळकाढूपणा सुरू दिसतोय याची नागरिकांमधून सर्वस्थरातून नाराजी दिसत आहे.

मागील दोन्ही सभेतील अनेक तक्रारी अजूनही तश्याच  बाकी आहेत. वेळकाढूपणा आणि सावळा गोंधळ टाळण्यासाठी संवाद सभा खुल्या वातावरणात झाल्या पाहिजेत, अशी मागणी मधुकर बच्चे यांनी केली आहे.

–  क्रातिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय