Wednesday, September 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयसामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आता इडी ( ED) च्या रडारवर !

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आता इडी ( ED) च्या रडारवर !

सध्या राज्यात ईडी(ED) च्या कारवाईमुळे राजकारण चांगलेच पेटलेले असताना ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर (Medha Patkar) या सध्या ईडीच्या रडारावर आल्या आहेत. पाटकर यांच्याविरुद्ध ईडीकडे एका संशयास्पद व्यवहाराची तक्रार करण्यात आली आहे.

हे प्रकरण २००५ चे असून ईडी याची चौकशी करणार आहे. पाटकर यांच्या ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल डिझेल दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ; महागाई तीव्र होण्याची शक्यता

नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयीत व्यवहार झाल्याचा आरोप झाल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ सालातील म्हणजे १७ वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. ईडीशिवाय डीआयआर म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालय आणि आयकर विभागतही पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नर्मदा नवनिर्माण अभियान हे बृहनमुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणी आहे. यामध्ये मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. या एनजीओच्या खात्यावर एकाच दिवशी १ कोटी १९ लाख २५ हजार ८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या.

पुणे : ..त्यांनी चक्क नवजात मुलीला घरी आणले हेलिकॉप्टरने, मुलीच्या जन्माने आनंदोत्सव…हा व्हिडिओ पाहाच !

या प्रकरणासंबधी बोलताना मेधा पाटकर यांनी सांगितले की, “माझ्यावर गुन्हा दाखल नाही. तक्रार दाखल केली आहे. हे माझ्याविरोधात राजकीय कारस्थान आहे. ज्यांनी ही तक्रार केली आहे, ते आमच्या समविचारी नसलेल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांचं नाव घेण्याची गरज नाही. त्यांनी ही तक्रार केली यामध्ये २० जणांनी एकच रक्कम जमा केल्याचा दावा केला आहे. पण हे घडलेलं नाही, पण हे हॅकिंगचं प्रकरण असल्याचं दिसतंय. याचा निष्पक्षपणे तपास व्हायला हवा.”

संबंधित लेख

लोकप्रिय