Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमंथन फाउंडेशन तर्फे रेड लाईट भागात जीवनावश्यक वस्तूंचे 75 महिलांना वाटप

मंथन फाउंडेशन तर्फे रेड लाईट भागात जीवनावश्यक वस्तूंचे 75 महिलांना वाटप

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित, क्रांतीदिनी मंथन फाउंडेशन तर्फे पुणे येथील लालबत्ती भागात कार्यक्रम 75 महिलांना गरजेच्या वस्तू आणि औषधांचे वितरण करण्यात आले.

संस्था महिलांसाठी आरोग्य तपासणी, गुप्तरोग, एचआयव्ही, एआटी ची औषधे, क्षयरोग, कॅन्सर आदी केली जाते. तसेच सामाजिक योजना आधार कार्ड, रेशन कार्ड, संजय गांधी योजना साठी काम करते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या 75 महिलांसाठी छत्री, सॅनिटरी पॅड, व टूथ ब्रश यांचे मोफत वाटप करण्यात आले.

मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की लालबत्ती विभाग हा दुर्लक्षित आहे. महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आरोग्य, सामाजिक व मानसिक स्वास्थ साठी संस्था काम करतेय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक वृषाली गोरे, गणेश खेडेकर, आरती गणुरे, मेरी डिसुझा, राधा पाटील, सुरेखा राठोड, रमा कतीब, छाया साळुंखे आदींचे सहकार्य मिळाले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय