Thursday, May 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदीपक गुप्ता यांच्याकडून चिखली, कुदळवाडी मध्ये मोफत तिरंगा वाटप

दीपक गुप्ता यांच्याकडून चिखली, कुदळवाडी मध्ये मोफत तिरंगा वाटप

पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली, कुदळवाडी, शाहूनगर, पवारवस्ती येथील नागरिकांना घरोघरी मोफत तिरंगा वितरण करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संदीप गुप्ता, ओमकार नागटिळक, नागेश कवडे यांनी 150 घरामध्ये तिरंगा वितरण केले.

या देशातील तरुण पिढीला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लाखो शहिदांच्या समर्पणाची जाणीव निर्माण होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस संपूर्ण शहरात हर घर तिरंगा मोहीम राबवत आहे, असे दीपक गुप्ता यांनी सांगितले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय