Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकामगार मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून कुटुंबियांना अर्थसहाय्य द्या — कष्टकरी संघर्ष महासंघाची...

कामगार मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून कुटुंबियांना अर्थसहाय्य द्या — कष्टकरी संघर्ष महासंघाची मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून काल दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी महानगरपालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा क्रमांक तीन आणि चारच्या टॅंक मधील गाळ काढत असताना या पाईप मध्ये अडकून डोक्याला मार लागल्याने अजित सिंग या कामगाराचा मृत्यू झाला आहे. हे अत्यंत दुर्दैवी घटना असून कामगारांच्या मृत्यूप्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांच्या मृताच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य व त्यांच्या वारसाला महानगरपालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.

सदरची घटना गंभीर असून आज अशा कष्टकरी, कामगारांचे मृत्यू हे खूप स्वस्त झालेले आहेत आणि या कामगारांची त्यांच्या जीवाची प्रशासनाला काय किंमत नाही. या प्रकरणात संबंधित सर्व ठेकेदार व अधिकारी यांनी कामगारांच्या सुरक्षेची कोणतेही काळजी घेतलेली नाही. संबंधित सर्वांची सखोल चौकशी करून दोषी संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मृत कामगार अजित सिंग यांच्या कुटुंबातील वारसास आर्थिक मदत द्यावी व महानगरपालिकेत नोकरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नखाते यांनी केली आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय