जुन्नर : मेनुंबरवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना असाणे गावचे सुपुत्र यशवंत भुरकुंडे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊ जाधव होते, तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गभाले यांची प्रमुख उपस्थिती होते.
तसेच माजी सरपंच सखाराम गभाले, रामदास भुरकुंडे, देवजी ढवळे, शिवाजी भालचिम, लक्ष्मण गभाले, प्रवीण गभाले, रवींद्र सुपे, गंगुबाई गभाले, नंदाबाई भालचिम, पार्वताबाई डामसे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक सैद व शिक्षिका बटवाल मॅडम उपस्थित होत्या.