Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणकुडावळे ग्रामस्थ मंडळ मुंबई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कुडावळे ग्रामस्थ मंडळ मुंबई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दापोली : दिनांक 9 जुलै 2022 रोजी कुडावळे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्यामार्फत कुडावळे गावातील कुडावळे आदिवासीवाडी, कुडावळे नं.1, कुडावळे वळजाई, कुडावळे देवखोल या चारही शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र कदम, उपाध्यक्ष अनिल कदम, अजित कदम, गणेश कदम तसेच मुंबई मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ मंडळ कुडावळेचे अध्यक्ष अंकुश कदम, सचिव निलेश कदम, कुडावळे येथील ग्रामस्थ तसेच माजी सरपंच महेश कदम, समेश कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. मुंबई मंडळाचे शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन सामाले यांनी केले तर आभार प्रदर्शन कुडावळे नं. 1 शाळेचे मुख्याध्यापक अनिल नलावडे यांनी केले.कुडावळे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय