Sunday, May 5, 2024
HomeNewsजुन्नर : बारव शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी प्रदक्षिणा

जुन्नर : बारव शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी प्रदक्षिणा

जुन्नर : श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था (शिवनेर), जुन्नर संचालित प्राथमिक विद्यामंदिर व बालमंदिर, बारव या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने ‘दिंडी’ प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते.

विविध भजने गात विद्यार्थ्यांनी बारव परिसरात दिंडी काढली. यावेळी बारव परिसरातील ग्रामस्थ सुमन मिरंगुडे व सुमन केदारी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. बारव परिसरात प्रदक्षिणा घालून आल्यानंतर हनुमान मंदीराजवळ विद्यार्थ्यांनी रिंगण धरले. यावेळी पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ढोबळे, बालक मंदिर विभाग प्रमुख मनिषा काशिद, शाळेतील शिक्षक रेश्मा गावडे, सुरेखा काळे, अलका करडे, विवेक हिंगे, नामदेव माळी, माधुरी फुलसुंदर, माधवी पुरी, महानंदा घोळवे, रोहिणी तोरकडी, शिला निंबाळकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय