Thursday, May 2, 2024
Homeआंबेगावरॉबर्टशॉ कंपनीतर्फे शाळेला कॉम्पुटर टेबल चे वितरण

रॉबर्टशॉ कंपनीतर्फे शाळेला कॉम्पुटर टेबल चे वितरण

आंबेगाव : लोणी ता.आंबेगाव येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाला या शाळेला विमाननगर येथील अमेरिकन कंपनी रोबर्टशॉ कंट्रोल्स प्रायव्हेट ली तर्फे कॉम्पुटर टेबल चे आज दि.४ ऑगस्ट रोजी वितरण करण्यात आले. रोबर्टशॉ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास कडलग आणि एच.आर. हेड मयूर लोखंडे यांनी कंपनीच्या सी.एस.आर. च्या माध्यमातून हा उपक्रम राबविला.

सदर टेबल ची आवश्यकता या शाळेला असल्याने मुलांसाठी कॉम्पुटर लॅब मध्ये याचा उपयोग होणार आहे आणि या लॅब चे उदघाटन येत्या १५ ऑगस्ट ला करण्यात येणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक वेताळ सर यांनी सांगितले.

एकूण १४ टेबल चे वितरण रोबर्टशॉ कंपनीचे पदाधिकारी किशोर थोरात आणि आशिष सेनापती यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या प्रसंगी किशोर थोरात यांनी रोबर्टशॉ कंपनी तर्फे शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले आणि जीवनात अवॉर्ड पेक्षा कामाला जास्त महत्व आहे हे संबोधित केले. किशोर थोरात यांना मिळालेल्या अवॉर्ड विषयी शाळेचे शिक्षक डुंबरे यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये थोरात यांच्या अवॉर्ड चा उल्लेख केला होता.

सदर कार्यक्रमाच्या अगोदर लोणी गावाने आणि माजी विद्यार्थी संस्थेने केलेल्या कामाची माहितीही कंपनीच्या पदाधिकारी यांना देण्यात आली. गाव आणि माजी विद्यार्थी यांनी केलेल्या उत्तम कामाचा आदर्श लोणी धामणी या गावात दिसून येत आहे. कार्यक्रम प्रसंगी लोणी गावातील प्रतिष्ठित वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन गायकवाड, मुख्याध्यापक वेताळ सर, शरद बँकेचे संचालक अशोक आदक, तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू पडवळ, वरिष्ठ पी.आय. प्रकाश वाळुंज साहेब, माजी सरपंच उद्धव लंके, शिक्षक समिती अध्यक्ष बाळशीराम वाळुंज मान्यवर उपस्थित होते.

वेताळ यांनी त्यांच्या शाळेतील सुमारे पंचवीस मुलांना परिस्थितीमुळे फी भरण्यास होत नाही असे सांगितल्यावर रोबर्टशॉ कंपनीचे पदाधिकारी शी आशिष सेनापती यांनी या पंचवीस मुलांना मदत करण्याचे आवाहन केले आणि प्रकाश डांगे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी सुमारे अकरा हजार रुपये देणगी दिली. शाळेचे काम बघून, या पुढेही शाळेच्या मदतीसाठी कंपनी नक्कीच हातभार लावेल असे आश्वासन किशोर थोरात यांनी दिले. कार्यक्रमाप्रसंगी किसनराव गायकवाड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तर साकोरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

  • क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय