Home ताज्या बातम्या Maharashtra CM : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा

Maharashtra CM : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार Devendra Fadnavis will take oath Chief Minister today Maharashtra CM

Maharashtra CM : महाराष्ट्रातील राजकीय पेच संपल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार, ५ डिसेंबर २०२४) मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील प्रमुख नेते आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. याशिवाय एकनाथ शिंदे यांना देखील मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.(Maharashtra CM)

राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवर पडदा पडणार असून राज्यातील जनतेचे लक्ष आजच्या शपथविधीकडे आहे.

शपथविधी सोहळ्याचा वेळ आणि ठिकाण (Maharashtra CM)

शपथविधी सोहळा संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल, तर देवेंद्र फडणवीस हे ५:३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या कार्यक्रमासाठी आझाद मैदानावर ३०,००० पेक्षा जास्त लोकांची व्यवस्था करण्यात आली असून, ४०,००० भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. सुरक्षेसाठी ४,००० पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, आझाद मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुसूत्रता आणि सुरक्षेची जबाबदारी दक्षतेने पार पाडली जात आहे. राज्यातील विविध भागांतून कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा :

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…

NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती

Exit mobile version