Home ताज्या बातम्या Mahayuti Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

Mahayuti Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

Mahayuti Cabinet महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला कुणाला किती मंत्रीपदं formula of Mahayuti government cabinet has been decided

Mahayuti Cabinet : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुती 5 डिसेंबर रोजी सरकार स्थापन करणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या भव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत झालेल्या भाजपा विधिमंडळ गटाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासोबतच इतर मंत्रिपदांचा फॉर्म्युलाही निश्‍चित झाल्याची माहिती मिळत आहे. महायुती सरकारमध्ये एकूण 43 मंत्रिपदे असण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजप, शिंदे गट, आणि अजित पवार गटाला मंत्रिपदे वाटप केली जातील.

भाजपने विधानसभेत 132 जागांवर विजय मिळवला, शिवसेना शिंदे गटाने 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. या पार्श्वभुमीवर नव्या महायुती सरकारमध्ये भाजपला 20 मंत्रीपदे, शिवसेना शिंदे गटाला 13 मंत्रीपदे, त्यापैकी 7 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री पदे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 5 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदे मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या ऐतिहासिक घडामोडींवर केंद्रित झाले आहे. (Mahayuti Cabinet)

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी अडीच हजार हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि 1500 हून अधिक पोलिस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत सहभागी असतील. याचबरोबर सशस्र पोलीस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत.

Mahayuti Cabinet

हे ही वाचा :

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…

NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती

Exit mobile version