Home ताज्या बातम्या Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ?...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार Ladki Bahin Yojana When will dear sisters get an installment of Rs 2100

Ladki Bahin Yojana : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ आता अधिक वाढणार आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्याची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात महिलांच्या मनात उत्सुकता असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून सुरू करायचा याचा निर्णय कॅबिनेट बैठकीनंतर होईल. या योजनेसाठी पात्रतेबाबतही काही महत्त्वाचे नियम ठरवले जातील. 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Ladki Bahin Yojana)

राज्यात आतापर्यंत 2 कोटी 26 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. निवडणुकीमुळे जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यांचे हप्ते तूर्तास थांबवण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकत्रित जमा करण्यात आले. आता महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपयांमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे.

महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला गती देण्याचे वचन देण्यात आले होते. विधानसभेतही या योजनेने मोठी भूमिका बजावत सरकारला जनतेचा कौल मिळवून दिला.

महिला वर्ग आता 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळेल याकडे उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतला जाईल. असे मुनगंटीवार यांनी सूचित केले आहे.

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

(Ladki Bahin Yojana)

हे ही वाचा :

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…

NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड

ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

Exit mobile version