Sunday, May 19, 2024
Homeजिल्हापुणे मनपाचे उपआयुक्त ACB च्या जाळ्यात, १ कोटीची बेहिशेबी मालमत्ता सापडली 

पुणे मनपाचे उपआयुक्त ACB च्या जाळ्यात, १ कोटीची बेहिशेबी मालमत्ता सापडली 

पुणे : पुणे महापालिकेच्या एका उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सुमारे २१ वर्षात १ कोटी रुपयाहून अधिक बेहिशेबी संपत्ती जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकल्याचे समजते.

महानगरपालिकेतील तांत्रिक विभागाचे उपायुक्तांसह पत्नीवर बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडे उत्पन्नापेक्षा १ कोटी २ लाख रुपयांची अधिकची संपत्ती आढळून आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २००० ते २०२१ या कालावधीतील मालमत्तेची चौकशी केली.

याप्रकरणी उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९) आणि त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.

विजय लांडगे हे पुणे महानगरपालिकेत तांत्रिक विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. एसीबीकडून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे. २००० ते २०२१ या कालावधीतील मालमत्तेची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा एक कोटी दोन लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय