Monday, March 17, 2025

मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्या “त्या” भेटीवर अखेर शिंदे यांनी सोडले मौन, म्हणाले…

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड करून भाजप सोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केले.

राज्यातील या राजकीय संघर्षानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून काल रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोन्ही नेत्यांची सिव्हर ओकवर भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून जोरदार चर्चाही सुरू आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करुन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. शिंदे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची आमची कोणतीही भेट झालेली नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

व्हायरल होत असलेला हा फोटो जुना असून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर उपचार सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी ११ नोव्हेंबर २०२१ ला शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळचा हा फोटो असल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर त्यावेळी हा फोटो राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles