आळंदी / अर्जुन मेदनकर : प्राथमिक आरोग्य केंद्र , कडूस येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तालुका आरोग्य कार्यालय खेड यांचे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र कडूस आणि राजगुरुनगर येथील कर्मचारी यांची पथके तयार करून पाठविण्यात आली आहेत. चांडोली, कडूस येथील घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक घरातील पाण्याने भरलेली भांडी, कुंड्या, फ्रिज , हौद यांची पाहणी करून त्यातील डास अळ्या नष्ट करण्यात येत आहेत.
संशयितांचे रक्तजल नमुने तपासणी साठी पाठवण्यात येत आहेत. नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी केले आहे पाण्याचा साठा करू नका, गप्पी मासे पाळा, गटारे वाहती करा आणि डास प्रतिबंधक मलम आणि मच्छर दाण्यांचा वापर करा.
विविध प्रकारचे संदेश आरोग्य विभागा मार्फत देण्यात येत आहेत. ग्रामपंचायत कडूस यांचे मार्फत गावात धूर फवारणी, कीटकनाशक औषधींची फवारणी करण्यात आली आहे. ताप , अंगदुखी, अशक्तपणा अशी कोणतीही लक्षणे वाटल्यास तत्काळ आरोग्य विभागास संपर्क करावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते यांनी ग्रामस्थांना केले आहे.
‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका
ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल