Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाडेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाकडून रेल्वेविरुद्ध १५ सप्टेंबरला आंदोलन

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाकडून रेल्वेविरुद्ध १५ सप्टेंबरला आंदोलन

परभणी, दि.५ : डीवायएफआय या युवक संघटनेच्या परभणी शाखेकडून १४ ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाला विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देऊन १५ दिवसांत मागण्या मान्य करण्याची विनंती करून त्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाची प्रत रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान व राष्ट्रपती यांना देखील देण्यात आल्या होत्या.

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवक संघटनेनी मागील महिन्यात १४ ऑगस्टला रेल्वे प्रशासनाचे महानिदेशक (GM) गजानन माल्या यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन देऊन त्या मागण्या सोडवण्याची विनंती केली होती. १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी पुन्हा निवेदन देऊन १५ सप्टेंबरला आंदोलन करीत असल्याचे सांगितले आहे. 

“या” आहेत मागण्या

– आधी असलेल्या यात्रा गाड्या पूर्ववत सुरु करा

– डेमो सुरूच ठेवायचीच असेल तर तिला मुंबईच्या लोकलसारखी सुरु करा

– यात्रा गाड्यांचे भाडे एक्सप्रेसच्या भाड्याएवढे म्हणजेच तीन पट वाढविले आहे ते तीन पटीने कमी करा

– कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी तत्वावर नियुक्त करून त्यांची पिळवणूक थांबवा

– रेल्वेचे खाजगीकरण पूर्णपणे थांबवा

या निवेदनावर डीवायएफआयचे जिल्हा सचिव नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, जय एंगडे, अजय खंदारे आणि सचिन नरनवरे आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय