Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून घोषित करण्याची...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी

मुंबई : लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते. परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणाने इतिहास घडवला.” दलित साहित्या”चा पाया रचण्यात काॅ. अण्णा भाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लेखन केले. कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा, लावण्या, चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. काॅ.अण्णा भाऊ साठे यांनी कलावंत म्हणून लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या. त्यांच्या या अष्टपैलूचा सन्मान करण्यासाठी 1 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘ ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा व्हावा, अशी मागणी राज्यातील विविध साहित्यिक, अभ्यासक व संघटनांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहित केली आहे.

राज्य सरकारला लेखन प्रेरणा दिनासंदर्भात मागणी करण्यासाठी 18 जुलै रोजी महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, सांस्कृतिक, सामाजिक संघटनांनी या संदर्भातील पत्र पाठवले आहे.

अर्जुन डांगळे, डॉ. बाबुराव गुरव, उर्मिला पवार, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. यशवंत मनोहर, हिरा बनसोडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. भारत पाटणकर, गणेश विसपुते, शाम गायकवाड, सुबोध मोरे, संध्या नरे पवार, डॉ. प्रज्ञा दया पवार, प्रतिमा जोशी, रझिया पटेल, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अजीज नदाफ, राकेश वानखेडे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. माया पंडित, डॉ. मेधा पानसरे, विश्वास पाटील आदी लेखक विचारवंत तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ, लोक सांस्कृतिक मंच, प्रगतिशील लेखक संघ, जनवादी लेखक संघ, दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती, जाती अंत संघर्ष समिति, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या संघटनांनीही मागणी केली आहे.

अण्णा भाऊ साठे फक्त केवळ लेखक, कलावंत नव्हते, तर ते प्रत्यक्ष येथील दलित-शोषित, कामगार, शेतकर्यांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत, स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, गोवा मुक्ती आंदोलनत सक्रिय सहभागी होते, तुरूंगवासही भोगला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या “लाल बावटा कला पथका” द्वारे काॅ. अण्णा भाऊ साठे शाहीर काॅ. अमर शेख, शाहीर काॅ.दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने त्यांनी आपल्या गाणी, पोवाडे, लोकनाट्यातून महाराष्ट्रच नव्हे तर देश ढवळून काढला व प्रचंड जन जागृती करून मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध विद्यापीठातील तरूण संशोधक आज अण्णा भाऊंच्या साहित्य, कर्तृत्वावर अभ्यास, संशोधन करीत आहेत.

2020 हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष होते. येणारा 1 ऑगस्ट हा अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस, जयंती आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी 1 ऑगस्ट हा “लेखन प्रेरणा दिन” म्हणून शासनाच्या वतीने अधिकृतपणे घोषित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

ब्रेकिंग : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आता न्यायालयाने दिली ‘ही’ तारीख, आज सुप्रीम कोर्टात काय झाले पहा !

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सुचना

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक होणार ?

अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या किसान सभेची मागणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय