Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक होणार ?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली. संजय पांडे यांच्यावर एनएसई कोलोकेशन आणि फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. पांडे यांच्या अटकेची किरीट सोमैय्या यांनी स्वागत करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

---Advertisement---

भाजप नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसापासून मोठा वाद बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी मधील अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप करत होते. या मध्ये सोमय्या यांच्या निशान्यावर संजय राऊत देखील होते. संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच संजय राऊत यांना आज (20 जुलै) चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने समन्समधून देण्यात आले आहे. अशात भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी अब संजय राऊत की बारी आहे, असं ट्विट केले आहे. विशेष म्हणजे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अटकेनंतर हे ट्वीट केल्याने संजय राऊत यांना अटक होणार असे सोमैय्या यांना सूचवायचे असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांची यापूर्वी दोन वेळा चौकशी झाली आहे. आज पुन्हा ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून राऊत यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

---Advertisement---

हेही वाचा :

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles