Friday, November 22, 2024
HomeNewsघरकुल मधील मतदारांची फेर नोंदणी करण्याची मागणी

घरकुल मधील मतदारांची फेर नोंदणी करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड : घरकुल मधील मतदारांची फेर नोंदणी करा अशी मागणी अशोक मगर यांनी केली आहे. चिखली येथील घरकुल प्रकल्पात गेली आठ वर्षे लोक राहायला आलेत, परंतु येथील मतदान नोंदणी जाणीवपूर्वक केली जात नाही. नवीन झालेल्या प्रभाग १२ मधे घरकुल मधील जरे एन्टरप्रायझेस या पत्यावरील मतदार नावे ही शेजारच्या प्रभाग 13 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, असेही अशोक मगर यांनी सांगितले.

घरकुल वसाहतीतीत सुमारे वीस हजार नागरिक रहात आहेत. येथे एक गठ्ठा नोंदणी होऊ नये, मतदारांची विभागणी व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी केला आहे. 

याबाबतीत वारंवार निवेदने निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिलेली आहेत. नवीन मतदान नोंदणी आँनलाईन केली, पेपर दिला तरी मतदान इतर चार प्रभागात वर्ग करण्यात आले आहे. 2000 हून जास्त मतदारांची नावे प्रभाग क्र 12 मध्ये नाहीत, असेही मगर म्हणाले. 

प्रशासनाने संपूर्ण घरकुलमध्ये फेरमतदार नोंदणी करावी अशी आग्रहाची मागणी करूनही घरकुल मधील मतदार नोंदणीपासून वंचित होत आहेत, त्यामुळे प्रभागाबाहेर मतदान केले जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात येणार आहे, असे अशोक मगर यांनी सांगितले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय