Saturday, May 18, 2024
Homeनोकरीसहायक प्राध्यापकांची 2 हजार 88 पदे भरण्याचा निर्णय

सहायक प्राध्यापकांची 2 हजार 88 पदे भरण्याचा निर्णय

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे अभ्यासक्रमात रचनात्मक बदल होत अंमलबजावणीसाठी कौशल्यपूर्ण प्राध्यापकांची गरज आहे. त्यासाठी सहायक प्राध्यापक संवर्गातील 2 हजार 88 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. 

उच्च शिक्षण विभागाने नुकताच शासन निर्णय काढला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने भरतीबाबतचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार 2 हजार 88 पदांपैकी उर्वरित पदे स्वायत्त महाविद्यालयांना वाटप करायची असल्याने प्रत्येक महाविद्यालयास 71.20 टक्के भरता येतील. 

तसेच अकृषी विद्यापीठाशी संलग्न अशासकीय अनुदानित 66 स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची 451 पदे भरली जाणार आहेत. अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे 2017 च्या विद्यार्थी संख्येनुसार लागू होणारी रिक्त पदे आधारभूत मानण्यात आली आहेत.

Lic life insurance corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय