Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरजुन्नर शहराच्या विकासकामांसाठी 118 कोटी निधी मंजूर; वाचा कशासाठी किती निधी ! 

जुन्नर शहराच्या विकासकामांसाठी 118 कोटी निधी मंजूर; वाचा कशासाठी किती निधी ! 

जुन्नर / आनंद कांबळे : शिवजन्मभूमी जुन्नर शहराच्या विकासकामांसाठी 118 कोटी रुपयांच्या  निधी मंजूर   करण्यात आला  आहे. लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शहर प्रमुख अविनाश करडीले, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, माजी नगरसेवक श्याम खोत, युवासेना प्रमुख सिद्धांत लोणकर, दर्शन फुलपगार, अभय वावळ, अकील शेख, विकास राऊत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जुन्नर शहरातील नागरिकांना स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्याकरिता 21 कोटी रुपयांचा खर्चाची माणिकडोह धरणातून थेट बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना शासनाने मंजूर केली आहे. शहरातील विविध विकास कामांमध्ये रस्ता काँक्रिटीकरण, सभामंडप, समाज मंदिर, बंदिस्त गटर पाईपलाईन, नाला बांधकाम, फुटपाथ बांधकाम, जलशुद्धीकरण प्रकल्प, संरक्षक भिंती, पथदिवे, स्मशानभूमी सुशोभीकरण, स्वच्छतागृहे, समाजमंदिर  याकरिता मोठ्या प्रमाणात निधी शासनाने मंजूर केला आहे.

शहरालगतच्या पद्मावती तलाव सुशोभीकरणाकरिता चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पद्मावती तलाव येथे चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार आहे. तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत जुन्नर शहराकरिता 39 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. शहरातील सांडपाणी पाणी शुद्ध करण्याकरिता ऐसटीपी प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. आंबेगव्हाण येथे 650 एकर एकर वर बिबट सफारी प्रकल्प शासनाने मंजूर केला असून त्याकरिता देखील 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जुन्नर-मुंबई अंतर कमी करणारा व जुन्नर तालुक्यात आर्थिक कायापालट करणाऱ्या तसेच ६० वर्षापासून मागणी असलेल्या दाऱ्या घाटासाठी विशेष पाठपुरावा करून या घाटाचे सर्वेक्षण खाजगी एजन्सी द्वारे केलेले असून शासनाकडून याकरिता डी.पी.आर तयार करण्यात येत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Lic Kanya Yojana

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय