Monday, March 17, 2025

“या” महिन्यात ‘इंडिया’ची बैठक मुंबईत होणार !

मुंबई : देशपातळीवर विरोधी पक्षांची एकजूट झालेली असून या आघाडीचे नाव ‘इडिया’ ठेवण्यात आले आहे. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यंनी दिली.

महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत शरद पवार यांनी बंगळुरू आणि पाटणा येथे झालेल्या बैठकीचा आपला अनुभव सांगितला. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत योग्य नियोजन कसं करता येईल, याचे मार्गदर्शन त्यांनी केलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे, रोहित पवार, सुनिल भुसारा आदी उपस्थित होते.

मुंबईत होणाऱ्या या बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles