Thursday, January 23, 2025

डहाणू : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आमदार विनोद निकोले यांनी घेतला आढावा

डहाणू : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी भागाची पाहणी करत आढावा घेतला.

चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली असता या पाश्वभूमीवर हवामान शास्त्र कार्यालय डहाणू येथून माहिती घेऊन आगर, नरपड, चिखला, डहाणू गाव आदी किनारपट्टीला भेट देऊन येथील कोळी बांधवांबरोबर चर्चा केली व आधिकऱ्यांसाहित वस्तुस्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी तहसीलदार राहुल सारंग, पोलीस निरीक्षक कदम, डहाणू नगरपरिषद उप मुख्याधिकारी जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. चंद्रकांत गोरखाना, कॉ. महेंद्र दवणे, कॉ. धनेश अक्रे, डॉ. आदित्य अहिरे हे उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles