Thursday, September 19, 2024
HomeहवामानCyclone remal : 135 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

Cyclone remal : 135 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

Cyclone remal : बांगलादेशातून निघालेले ‘रेमल चक्रीवादळ’ रविवारी रात्री ८.३० वा पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला.

ताशी 135 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. चक्रीवादळासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे त्या परिसरातील घरे, शेत पाण्याखाली गेली आहेत. Cyclone remal

राज्यातील तीन किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा महत्वपूर्ण प्रभाव दिसून आला.त्यामुळे तब्बल १ लाख ८० हजार लोकांना राज्यसरकारने शाळा, महाविद्यालये आदी सुरक्षित स्थळी हलवले आहे.

ताशी ११० ते १२० किमी होती, जी नंतर वाढून ताशी १३५ किमी झाली.यावरून हे चक्रीवादळ किती तीव्र आहे हे समजते.आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे डायमंड हार्बर, सागर बेट, हिंगलाज, संदेशखळी या भागात नुकसान झाल्याची माहिती आहे. West Bengal news

कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याने ३९४ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

तसेच किनारपट्टीवरील सर्व रिसॉर्ट, हॉटेल्स मध्ये असलेल्या पर्यटकांना बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल (indian coast guard), बंगाल पोलीस, होमगार्ड सह आपत्कालीन विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. Cyclone remal

कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहात आहेत. चक्रीवादळामुळे अनेक भागात कमकुवत घरे, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले.

सुंदरबनच्या गोसाबा परिसरात ढिगारा पडल्याने एक जण जखमी झाला आहे. दिघा शहराच्या किनारपट्टीवरील समुद्राच्या भिंतीवर मोठमोठ्या लाटा उसळताना दिसत आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

संबंधित लेख

लोकप्रिय