Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने आता यूट्यूबच्या दुनियेतही आपले अस्तित्व दाखवले आहे. रोनाल्डोने नुकतेच ‘UR Cristiano’ नावाचे आपले यूट्यूब चॅनेल लाँच केले असून अवघ्या 90 मिनिटांत या चॅनेलला 10 लाख सब्सक्राइबर मिळाले आहेत. यासह, रोनाल्डोने एक नवीन रेकॉर्डदेखील स्थापन केला आहे. आता पर्यंत या चॅनेलला 37.5 मिलियन सब्सक्राइबर मिळाले आहेत.
या चॅनेलच्या लाँचच्या दिवशी रोनाल्डोने 12 व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यांना जवळपास 50 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. थिंकफिकच्या अहवालानुसार, यूट्यूबवर एका दिवसात मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे रोनाल्डोने सुमारे 300,000 डॉलर्सची कमाई केली आहे. या कमाईमुळे तो सोशल मीडियावरही आघाडीचा खेळाडू बनला आहे.
21 ऑगस्ट रोजी लाँच केलेल्या या चॅनेलला एकूण 1 कोटी सबस्क्राइबर्स मिळवले आहेत, ज्यामुळे रोनाल्डोला यूट्यूबचे गोल्डन प्ले बटण प्राप्त झाले आहे. रोनाल्डोने आपल्या मुलांसोबत गोल्डन प्ले बटणाचा आनंद साजरा केल्याचा व्हिडिओ देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
Cristiano Ronaldo
रोनाल्डो यापूर्वीच इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींपैकी एक आहे, ज्याला 676 दशलक्ष लोकांनी फॉलो केले आहे. याशिवाय, रोनाल्डोने यूट्यूबवरील सर्वाधिक सबस्क्राइबर्स आणि सर्वाधिक व्ह्यूजचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळत आहेत, ज्यामुळे त्याचे यूट्यूबवरील यश अनेक पटींनी वाढत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती