Sudhir Mungantiwar : दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेच्या मंचावरून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करणारे उद्गार काढून बहिण भावाच्या व महिलांच्या पवित्र नात्याला अपमानित केल्याचा आरोप माकपने केला आहे. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करीत असून, बहिण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे उद्गार मागे घ्यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
सध्या देशामध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या सभा होताना आपण पाहतो आहे. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन केवळ मताचा जोगवा मागण्याकरिता अशा रीतीने अगदी खाल्याची पातळी गाठून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे त्या महाराष्ट्रात बहीण भाऊ आणि महिलांना कलंकित करणारे असे उद्गार सांस्कृतिक मंत्र्याकडून जाहीरपणे करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
1984 मध्ये घडलेल्या दंगलीचे समर्थन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत नाही. परंतु त्या दंगलीचा आधार घेऊन मतदारांना व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, सामाजिक स्वास्थ बिघडवणे अपेक्षित नाही. कपडे काढून बहीण भावाला एकाच खाटेवर झोपविले या विधानाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खंडन करीत असून असे विधान करणे म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याला अपमानित करणे असेच होय, असेही माकपने म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये महिला वरील अत्याचार सतत वाढत आहे. मनिपुर येथील महिलांना लग्न करून त्यांची दिंड काढल्या गेली त्यावर भाजप एक शब्द बोलली नाही. एन सी आर बी नुसार 2014 मध्ये दर तासाला महिला विरुद्ध सुमारे 37 गुन्हे घडले होते. परंतु 2021 पर्यंत ही संख्या 49 वर गेली म्हणजेच या गुन्ह्यात 30 टक्के होऊन अधिक वाढ भाजपच्या काळात झाली आहे. 2021 पर्यंत दैनंदिन बलात्काराची संख्या दररोज सरासरी 90 पेक्षा जास्त होती 2014 मध्ये अनुसूचित जमातीच्या मुलीवर होणाऱ्या बलात्काराची संख्या दर दिवशी 2.5 वरून 2021 मध्ये दर दिवशी चार बलात्कारावर पोहचली. अनुसूचित जातीच्या मुलीवर होणाऱ्या दैनंदिन बलात्काराची संख्या याच कालावधीत अकरावर गेली. 2017 ते 22 अशी सलग सहा वर्ष महिलाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. 2019 ते 2022 पर्यंत महिला विरुद्ध च्या गुन्ह्यामध्ये राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 2023 मध्ये महाराष्ट्राने राजस्थानला मागे टाकून दुसरे स्थान मिळवलेले आहे. एन सी आर बी च्या आकडेवारीनुसार 2017 पासून मुलावरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये 94.47% वाढ नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेश मध्ये 2022 मध्ये नोंदविलेल्या एकूण 63414 प्रकरणंपैकी लैंगिक गुन्ह्याच्या 8136 मध्ये सर्वाधिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. माननीय मोदी आणि माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे या विषयावर का बोलत नाही हाच खरा प्रश्न आहे, असा सवालही माकप ने केला आहे.
प्रतिष्ठे पायी होणाऱ्या गुन्ह्याविरुद्ध कायदा करण्याची मागणी लावून धरली असताना असा कायदा करण्यासाठी भाजप सरकारने नकार दिला आहे. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या गुन्ह्याच्या विरुद्ध आणि महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध कडक कारवाई कर करण्याचा कायदा करण्यासाठी भाजपच्या सरकारने कोणतेही सौजन्य दाखविलेले नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर महिला सक्षमीकरणाच्या बाता करीत आहे. “आधी कायदा करा आणि नंतर बोला” हीच भूमिका माकप ची राहिलेली आहे, असेही माकपने म्हटले आहे.
बहिण भावाच्या पवित्र नात्याच्या बद्दल सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काढलेल्या त्या उद्गाराचा निषेध करण्याकरिता आज रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्या विधानाचा जाहीर निषेध केला, असे कॉम्रेड कुमार मोहरम पुरी ऍड काँ. दिलीप परचाके, कॉ.मनोज काळे कॉ.नंदू बोबडे कॉ. गजानन टाकसाडे, यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले असून, या पत्रकार परिषदेला कॉम्रेड कुमार मोहरमपुरी एडवोकेट कॉम्रेड दिलीप परचाके, कॉ. मनोज काळे, कॉ. नंदू बोबडे, गजानन ताकसांडे व अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा :
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !
ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू
मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का
मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा
मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा झटका
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !