Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी: माकप नेते सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांसह तीन व्यक्तींवर दिल्ली...

मोठी बातमी: माकप नेते सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांसह तीन व्यक्तींवर दिल्ली दंगल भडकवल्याचा आरोप, चार्जशीट दाखल

दिल्ली : दिल्ली पोलिसांनी दंगलींचे षडयंत्र पसरविल्याचे आरोप ठेवत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष, डीयूचे प्रोफेसर अपूर्वानंद, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियान नेते योगेंद्र यादव आणि डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माते राहुल रॉय यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आंदोलकांनी दंगली पेटवल्याच आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांना यात ओढले असून  प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लोक विचारवंत अपूर्वानंद, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव आणि डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माते राहुल रॉय यांनी आंदोलकांना प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


दिल्ली पोलिस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून डाव्या विचारांच्या व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येच्युरी यांनी ट्विट केले आहे की, “दिल्ली पोलिस भाजपचे केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. त्यांच्या बेकायदेशीर आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे भाजपच्या वरिष्ठ राजकीय नेतृत्त्वाचे वैशिष्ट्य दिसून येते.  त्यांना विरोधी प्रश्नांची आणि शांततेत निदर्शनांची भीती आहे. आणि सत्तेचा दुरुपयोग करून आम्हाला थांबवायचे आहे.”


तर योगेंद्र यादव यांनी ट्विट करत, “निर्दोष सिद्ध होईपर्यंत त्रास देणे योग्य आहे.  सीएएच्या सर्व विरोधकांना षडयंत्रकारांच्या वर्तुळात खेचण्यासाठी दिल्ली पोलिस जोरदार प्रयत्न करीत आहेत.  माझे स्पष्टीकरण फक्त इतकेच आहे की, अद्याप दिल्ली पोलिसांनी माझे किंवा येचुरीचे औपचारिक नाव कट रचणारे किंवा आरोपी म्हणून ठेवले नाही. भारतीय लोकशाही मोठी आहे
.”

दरम्यान, जेएनयूच्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय