Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात स्वच्छतागृहात घेतला गळफास

---Advertisement---

नाशिक प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयात २६ वर्षीय पुरुष  रुग्णाने  स्वच्छतागृहात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना (दि.१२)घडली आहे.या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.सिन्नर तालुक्यातील मुसगाव गावातील सचिन सोनवणे(वय२६) हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी ३ वाजता उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता.त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु सायंकाळी त्याने स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेऊन त्याने जीवन संपवले.ही बातमी तात्काळ सिव्हिल पोलीस चौकीतील पोलिसना कळवली. त्यांनी घटनास्थळी येऊन मूर्तदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला.

---Advertisement---

      परंतु अजून पर्यत त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही.त्यांनी दिलेल्या माहिती मध्ये नातेवाईकांना संपर्क करण्याचा पर्यन्त चालू आहेत अजून पर्यत कुणी प्रतिसाद दिलेला नाही.पुढील तपास पोलीस करत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles