Wednesday, May 1, 2024
Homeकृषीबीडमध्ये 'भारत बंद' यशस्वी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय सहभाग राहणार -...

बीडमध्ये ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय सहभाग राहणार – माकप नेते मोहन जाधव

बीड (लहू खारगे) :  देशाच्या राजधानीत दिल्ली येथे चाललेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवार दिनांक ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘भारत बंद’ला बीडमध्ये यशस्वी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे माकप चे ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव यांनी म्हटले आहे. तसेच सर्व शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, कर्मचारी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बंदमध्ये सामील होऊन एक दिवस शेतकऱ्यांसाठी साथ द्यावी, असे आवाहन देखील मोहन जाधव यांनी केले आहे.

अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समिती सोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उद्याच्या बंदमध्ये अग्रक्रमाने भाग घेणार आहे. कारण दिल्लीत मागील दहा दिवसांपासून मोठे शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भव्य एल्गार शेतकऱ्यांनी पुकारलेला आहे. याला भाजप वगळता इतर सर्वच पक्ष, संघटनांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हेच यातून दिसत आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी उद्या होणाऱ्या बंदमध्ये माकप सहभागी होणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले आहे.

उद्याच्या बंदमध्ये सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक आणि विद्यार्थी यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा आणि ‘भारत बंद’ यशस्वी करावा, असे आवाहन माकप बीड शहर शाखेच्या वतीने माकप नेते मोहन जाधव, सुहास जायभाये, प्रा. कुंडलिक खेत्री, रोहिदास जाधव, राम शेळके, अनिकेत गुरसाळी, दत्ता सुरवसे, विजय लोखंडे, अभिषेक शिंदे, निखिल शिंदे आदींनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय