Thursday, April 18, 2024
Homeग्रामीणआदिवासी भागात जलपरिषद मिशन अंतर्गत आडगाव गावात वनराई बंधारा बांधण्यात आला.

आदिवासी भागात जलपरिषद मिशन अंतर्गत आडगाव गावात वनराई बंधारा बांधण्यात आला.

नाशिक (उत्तम गावित): पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या जलपरिषद मिशनअंतर्गत आडगाव येथे वनराई बंधारा बांधून सहभाग नोंदवला आहे. 

आडगाव ग्रामपंचायत मध्ये गायमुख येथे हा वनराई बंधारा बांधण्यात आला. पेठ तालुक्यातील आदिवासी विकास परिषदेचे नेते नेताजी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा वनराई बंधारा बांधण्यात आला. आडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असे 3 वनराई बंधारे बांधण्यात आले. यामुळे गावातील जनावरांना पिण्याच्या सोई होणार आहे. तीन बंधारे बांधल्यामुळे थोड्याफार प्रमाणात पाणीटंचाई कमी होईल, असे दिसून येते.

या प्रसंगी नेताजी गावित, योगीराज भांगरे, आनंदा जाधव, रवींद्र दळवी, पुंडलिक गायकवाड, संदीप भांगरे, पोपट महाले यांच्यासह ग्रामस्थ आणि जलपरिषदचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय