Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनागुजरात सिमावर्ती अतिदुर्गम पिंपळसोंड भागातील गावांना कोविड लसीकरणाला सुरुवात

गुजरात सिमावर्ती अतिदुर्गम पिंपळसोंड भागातील गावांना कोविड लसीकरणाला सुरुवात

आदिवासी समाजामधील भीती होतेय दूर

सुरगाणा (दौलत चौधरी) : अतिदुर्गम भागातील पांगारणे, रघतविहीर, हडकाईचोंड, पिंपळसोंड या गुजरात सिमावर्ती भागातील आदिवासी बांधवामध्ये कोरोना लसी विषयी अनेक समज गैरसमज निर्माण झाल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. हि मनातील भीती दुर करण्यासाठी पंचायत  समितीच्या माजी सभापती मंदाकिनी भोये, डांगी भाषिक जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी स्थानिक मायबोली डांगी, कोकणी, अहिराणी बोली भाषेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनप्रबोधन केल्याने आदिवासींच्या मनातील भीती दुर झाल्याने लसीकरणाला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डांगी भाषिक रतन चौधरी यांनी तर विवाह समारंभ, दशक्रिया विधी कार्यक्रम, अंत्यविधी कार्यक्रम आदी ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. लसीकरणाच्या होत असलेल्या कँम्प मध्ये भदर 62, उंबरदे 40, प्रतापगड 100,  हडकाईचोंड 62, पिंपळसोंड 10, खोकरी 100 या प्रमाणे प्रतिसाद मिळत आहे. मालगव्हाण,  सुरगाणा, करंजाळी, सातबाभळ या गावात माणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मधुकर पवार, माजी खासदार हरिचंद्र चव्हाण,  जि. प. सदस्या कलावती चव्हाण,  वाय. एन. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

यावेळी पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अहिरे, मलेरिया वर्कर पाडवी, परिचारिका श्रीमती जाधव, ग्रामपंचायत सदस्य  तुळशीराम खोटरे, पोलिस पाटील रतन  खोटरे, शिक्षक पवार, माजी सैनिक शिवराम चौधरी, महादू खोटरे, रमेश बागुल व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय