Thursday, November 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना उद्रेक : 'या' देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र...

कोरोना उद्रेक : ‘या’ देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र झोपण्यावरही बंदी

चीन : चीनच्या सर्वात मोठे औद्योगिक शहर असलेल्या शांघाय मध्ये सर्व नागरिक कडक लॉक डाउन  लॉकडाऊन मध्ये आहेत. किराणा, जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला आहे. शहराच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कोविड उद्रेकात त्यांचे अन्न संपत आहे. मार्केटमध्ये खरेदी करण्यास कोणालाच परवानगी नाही.

गुरुवारी शहरात सुमारे 20,000 कोव्हीड रुग्णाची नोंद झाल्यानंतर सरकारने कडक निर्बंध लादलेले आहेत. सोमवारी 25 दशलक्ष लोकसंख्येचे शांघाय शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदांसाठी भरती

प्रशासकीय अधिकार्‍यांनी कबूल केले आहे की, शहराला “अडचणी” येत आहेत परंतु ते सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिआन आणि वुहानसह शहरांमध्ये लाखो लोकांनी  2020 कडक निर्बंध सहन केले आहेत. चीनची मोठी आर्थिक राजधानी शांघायच्या शटडाउनमुळे चीन आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

शांघायमधील स्थानिक लोक अतिशय खडतर जीवन जगत आहेत. सोशल मीडियावर शहरातील झलक दिसून येत आहेत. शांघाय हे चीनमधील सध्याच्या COVID-19 उद्रेकाचे हॉटस्पॉट आहे. गेल्या काही दिवसांत दैनंदिन संसर्गाची संख्या कमी झाली असली तरी इतर तुलनेत ते अजूनही लक्षणीय आहे. या शहरातील सर्व 26 दशलक्ष रहिवाशांना घरी राहण्यास सांगितले आहे.

व्हिडिओ : अवकाळी पावसाने कराड शहर झोडपले, झाडे कोसळली, गारपीटचाही तडाखा

शांघायच्या रस्त्यावर सार्वजनिक घोषणा करण्यासाठी आरोग्यसेवा कर्मचारी मेगाफोन वापरत असल्याचे दाखवते. रात्रीपासून, जोडप्यांनी स्वतंत्रपणे झोपावे, चुंबन घेऊ नये, मिठी मारण्याची परवानगी नाही आणि वेगळे खावे, असे सांगणारे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय