Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीआलिया आणि रणवीर अडकणार लग्न बंधनात, मुहूर्त ठरला !

आलिया आणि रणवीर अडकणार लग्न बंधनात, मुहूर्त ठरला !

 

मुंबई: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि क्युट गर्ल आलिया भट्ट हे गेल्या साडेचार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर आता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor) कपूर यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

शुक्रवारी, आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी एका मुलाखतीत आलिया आणि रणबीरच्या लग्नाची (Wedding) तारिख जाहिर केली आहे. त्यानुसार येत्या १४ एप्रिल २०२२ ला हे जोडपं विविहबंधनात अडकणार आहे.

पुणे बारामती लोकल येत्या सोमवार पासून नियमित सुरू

रणबीर आणि आलियाने 2017 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हा ते ब्रह्मास्त्रच्या  चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर मे 2018 मध्ये ते दोघे अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले तेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करत आपण रिलेशनशीपमध्ये आहोत हे जाहीर केलं. 2020 मध्ये, रणबीर म्हणाला होता की, कोविड -19 नसता तर त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले असते.

आलियाचे काका रॉबिन, जे तिचे वडील महेश भट्ट यांचे सावत्र भाऊ आहेत, यांनी सांगितले की, आलिया आणि रणबीर १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. आलियाचा मेहंदी सोहळा १३ एप्रिलला होणार असून त्यानंतर विवाहसोहळा होणार आहे. हा भव्य विवाहसोहळा रणबीरच्या वांद्रे येथील घरी होणार आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय