Friday, May 3, 2024
HomeNewsपुणे बारामती लोकल येत्या सोमवार पासून नियमित सुरू

पुणे बारामती लोकल येत्या सोमवार पासून नियमित सुरू

 

पुणे –पुणे ते दौंड आणि बारामती ते दौंड मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या एका फेरीचा विस्तार 11 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बारामती ते पुणे मार्गावर प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

मागील दोन वर्षापासून बारामती ते पुणे मेमु बंद होती. त्यादरम्यान एसटी हा एकमेव पर्याय होता. परंतु एसटीचा संप सुरू असल्याने प्रवासात पुढे कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही अशात खाजगी गाड्यांची चांगली चंगळ झाली. मात्र ग्राहकांना याचा फटका बसला होता . येत्या सोमवारपासून पुणे बारामती मार्गावर प्रवास करणे सोपे होणार आहे.

मोठी बातमी : गुणरत्न सदावर्ते यांना अटक, ‘या’ कलमांखाली अटक

येत्या सोमवारपासून (11 एप्रिल) पुणे ते दौंड मेमू (01531) आता बारामतीपर्यंत धावणार आहे. ही मेमू पुण्याहून 6.45 वाजता सुटणार असून, रात्री 9.50 वाजता बारामती येथे दाखल होणार आहे. तर बारामती ते दौंड मेमू (01528) पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. ही मेमू बारामतीहून दुपारी 4.50 वाजता सुटणार असून, पुण्यात 7.53 वाजता पोहोचणार आहे.

याचबरोबर पुणे-कोल्हापुर-पुणे एक्‍स्प्रेसची सेवा देखील 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुण्याहून सकाळी 10.50 वाजता एक्‍स्प्रेस सुटून सायंकाळी 7.30 वाजता कोल्हापूरात पोहोचणार आहे. तर कोल्हापूरहून सकाळी 5.30 ला सुटणारी एक्‍स्प्रेस दुपारी 1.35 वाजता पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदांसाठी भरती

विशेष : पृथ्वीच्या आणि भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी कृतीची गरज, हवामान बदलामुळे मानवी जीवन धोक्यात !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय