Tuesday, May 7, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी होण्या आधीच...

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी होण्या आधीच…

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांसोबत सोनिया गांधी यांच्या बैठका सुरू होत्या. या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हॅरोल्ड प्रकरणात ईडीने (ED) नोटीस पाठवली असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सोनिया गांधी या ८ जूनला इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार होत्या, मात्र सोनिया गांधी यांना बुधवारी संध्याकाळी तापाची हलकी लक्षणं समोर आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे त्यांची नॅशनल हॅरोल्ड प्रकरणात चौकशी पुढं ढकलण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांची चौकशी पुढे ढकलण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी देखील परदेशात असल्याने ED चौकशी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज आता एडिटही करता येणार, काय आहे खासियत वाचा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रिक्षा चालक संघटनांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न घेतले समजून

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय