Sunday, May 19, 2024
Homeराजकारणहार्दिक पटेल यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, म्हणाले मी मोदींचा…

हार्दिक पटेल यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, म्हणाले मी मोदींचा…

Photo Credit : Twitter / Hardik Patel

गांधीनगर : गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. १८ मे रोजी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू होती. या चर्चेला आता पुर्ण विराम मिळाले आहे.

गुजरातमधील गांधीनगर येथील भाजपच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलने यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी देशहित आणि राज्याच्या हिताची कामे करण्याबरोबरच आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लहान सैनिक म्हणून काम करणार असल्याचे म्हटले आहे.

हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा देताना राहुल गांधींवर निशाणा साधला होता. तर भाजपमध्ये सामील होण्या आधी पंतप्रधान मोदी आणि भाजपने केलेल्या कामाचे कौतुक केले होते.  हार्दिक पटेल यांनी 2019 मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय