Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक, विमान फेऱ्या रद्द

चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक, विमान फेऱ्या रद्द

बीजिंग : चीनमध्ये पुन्हा करोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चीन प्रशासन अलर्ट झाले आहे. चीनमधील अनेक विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून शाळा देखील बंद केल्या आहेत तसेच करोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. 

चीनमध्ये सलग पाच दिवशी (गुरुवारी) १३ करोनाचे नवे रुग्ण आढळले. हा नवा संसर्ग देशाच्या विविध भागात प्रवास करणाऱ्या वृद्ध प्रवाशांमध्ये आढळून आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्यानं शांघाय, झियान गन्सू आणि मंगोलिया प्रांतात प्रवास केला होता. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनाही संसर्गा झाल्याचं समोर आलं आहे. चीनच्या प्रशासनानं देशांतर्गत प्रांतांच्या सीमा बंद केल्या असून काही ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. तर शीआन आणि लान्झोऊ विमानतळावरून होणाऱ्या ६० टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, चीन सरकारने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या प्रभावित ठिकाणी शाळा आणि सर्व मनोरंजन ठिकाणं बंद करण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळे बंद केली आहे. चीन सरकारने लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केले असून अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय