Friday, May 17, 2024
Homeराज्यसंविधान आणि देश दोन्ही धोक्यात – कॉ.सिताराम येचुरी

संविधान आणि देश दोन्ही धोक्यात – कॉ.सिताराम येचुरी

कॉ.बुरांडे आणि सहकारी यांच्या स्मारकाचा दिमाखदार लोकार्पण सोहळा संपन्न

परळी / अशोक शेरकर : लोकशाही, आत्मनिर्भरता,सामाजिक न्याय आणि केंद्र व राज्य सरकारचा समनव्य या संविधानाच्या स्तंभाची पायमल्ली देशात सुरू असून कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ” जुडेगा-भारत : जितेगा इंडिया ” ही चळवळ सर्वांनी एकत्र येऊन पुढे नेण्याची गरज आज देशभरात निर्माण झाली आहे असे प्रतिपादन माकप चे राष्ट्रीय महासचिव कॉ.सिताराम येचुरी यांनी केले. Constitution and country both in danger – Com.Sitaram Yechury

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व बीड जिल्ह्याचे माजी खासदार, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवार दि 01 ऑक्टोबर रोजी परळी तालुक्यातील मोहा या गावी कॉ.अप्पा व त्यांच्या सहकारी यांचा स्मारकाचे दिमाखदार लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी कॉ.सिताराम येचुरी यांच्यासह किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ.अशोक ढवळे, माकप चे राज्य सचिव कॉ.डॉ.उदय नारकर,सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी. एल.कराड, माकपचे सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने, कॉ.पी.एस घाडगे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

संविधान आणि देश दोन्ही धोक्यात – कॉ.सिताराम येचुरी Constitution and country both in danger – Com.Sitaram Yechury

पुढे बोलताना कॉ.येचुरी म्हणाले की देशाचा कारभार चुकीच्या हातात गेलेला आहे.संविधानाच्या तत्वांची पायमल्ली राजरोसपणे सुरू असून सरकार च्या विरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जात आहे ही शोकांतिका आहे. इ.डी सारख्या संस्थेचा गैरवापर करून विरोधकांना परेशान करण्याचे काम करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्याला जो ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे मात्र सर्व नीतिमत्ता मातीत मिसळण्याचे काम कशा पद्धतीने सर्वच एकत्र येऊन सत्तेवर आलेल्या पक्षांनी केले हे येथील जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. फक्त भांडवलदारांचे हित जोपासत शिक्षण, रोजगार आणि शेतकरी यांना वंचीत ठेऊन गरिबांचा भारत आणि श्रीमंतांचा शायनिंग इंडिया अशी देशाची फाळणी सुरू असून देशातील जनतेने देशभक्ती जागी करून देश वाचवने आणि चुकीच्या लोकांना सत्तेपासून दूर करने गरजेचे आहे. कॉ.अप्पा यांच्या समाजवादी विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदर्श समाज निमिर्तीचे कार्य मोहा गावात सुरू आहे हे उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित असलेले किसान सभेचे डॉ.ढवळे यांनी धर्मांध, जातीयवादी, मनुवादी संघटना पासून देशाला धोका निर्माण झाला असून बीड सारख्या मागास व दुष्काळी भगत पीक विमा, कर्ज माफी या सारख्या गंभीर प्रश्नावर किसान सभा कायम पाठीशी आहे आणि राहणार असे आश्वासन दिले तर दुसरे प्रमुख अतिथी डॉ.नारकर बोलताना म्हणाले की, छ. शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कॉ.अप्पा याचे आचरण होते. राज्यकर्त्यांनी शिक्षण ही जबाबदारी झटकली असली तरी ग्रामीण भागातील उपेक्षित समाजातील मुलं शिकले पाहिजे यासाठी 1960 मध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करून आदर्श समाज घडविण्याचे कार्य केले.महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्याच राज्यात दिशाहीन,नितीहीन कारभार सुरू असून सर्वांनी याविरोधात एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय समारोपात डॉ.कराड यांनी महाराष्ट्र शिक्षण संस्थेसारख्या नीती मूल्यावर चालणाऱ्या संस्था टिकल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.

आपल्या प्रास्ताविकातून संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांनी स्मारक उभा करण्यामागील उद्देश स्पस्ट करत मोहा गाव हे नेहमीच पुरोगामी विचाराचे पाईक असलेलं गाव असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयाजीराव देशमुख व प्रा.बुरांडे मॅडम यांनी केले तर आभार व्यक्त उपप्राचार्य विनायक राजमाने यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय